News Flash

दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू-पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक स्तरावर असलेल्या तीन समस्यांचा उल्लेखही मोदी यांनी त्यांच्या भाषणात केला

दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू आहे, या समस्येशी लढणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्सच्या बैठकीत केले. आजपासून जपानमधील ओसाका या ठिकाणी ब्रिक्स देशाची जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांचा सहभाग आहे. या परिषदेत बोलताना दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. दहशतवाद हा फक्त निष्पापांचे बळीच घेत नाही तर त्यामुळे विकासाच्या गतीवर आणि सामाजिक समानतेवरही फरक पडतो असेही मोदींनी म्हटले आहे. दहशतवाद आणि जातीयवाद रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मोदींनी म्हटलं आहे.

 

जगासमोरच्या तीन आव्हानांबाबतही मोदींनी या परिषदेत भाष्य केले. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आहे तसेच व्यापारविषयक अनिश्चितता आहे. नियमांवर आधारीत बहुराष्ट्रीय व्यापाऱ्यांबाबत घेतले जाणारे एकतर्फी निर्णय, साधनसंपत्तीची कमतरता भासते आहे त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक आवश्यक आहे. विकास साधायचा असेल तर वेगाने प्रगती करणारे तंत्रज्ञान अंगिकारले जाणे महत्त्वाचे आहे. सशक्तीकरणाला हातभार लावतो तोच खरा विकास असेही मोदींनी म्हटले आहे.

या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोदींनी पाच सूचनाही दिल्या आहेत. ब्रिक्स देशांनी आपसात ताळमेळ ठेवला तर एकतर्फी निर्णयांवर काही प्रमाणात अंकुश ठेवला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्तरावर व्यापार, संस्था आणि वित्त संस्था यांच्या सुधारणांवर भर देणे गरजेचे आहे. निरंतर आर्थिक विकास साधायचा असल्यास साधनसंपत्तीची निर्मिती होणे गरजेचे आहे हे आणि असे पाच उपाय नरेंद्र मोदींनी सुचवले आहेत. मात्र दहशतवादाचा मुद्दा हा त्यांनी आवर्जून मांडला असून ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र यावं असंही मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 8:55 am

Web Title: terrorism is the biggest threat to humanity say pm modi in brics meeting in osaka scj 81
Next Stories
1 ट्रम्प आणि मोदी भेट, चार प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा
2 अमेरिकी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करा!
3 लुधियाना कारागृहात कैद्यांच्या संघर्षांत १ ठार
Just Now!
X