News Flash

काश्मीरमधील ‘त्या’ भाजपा नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबाचा हात – पोलीस महानिरिक्षक

कलम ३७० हटवल्यापासून भाजपा नेते होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

विजय कुमार, पोलीस महानिरिक्षक, जम्मू-काश्मीर

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तीन भाजपा नेत्यांच्या हत्येमागे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी गुरुवारी दिली.

आयजी विजय कुमार म्हणाले, “‘लष्कर’चा छुपा गट असलेल्या द रेजिस्टंस फ्रन्ट (टीआरएफ) या गटाने या हत्यांची जबाबदारी घेतली आहे. केंद्र सरकारने जेव्हापासून काश्मीरमधून कलम ३७० हटवले आहे तेव्हापासून या दहशतवादी संघटनेकडून भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांवर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते.”

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सहा भाजपा नेत्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर १६ भाजपा सदस्यांनी जाहीररित्या त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा त्याग केला होता. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकतेच बिगरकाश्मिरींना जमिनी विकत घेता येईल, हा नवा कायदा केंद्र सरकारनं मंजूर केला. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपा नेत्यांवर हल्ला झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 5:14 pm

Web Title: terrorist group lashkar e taiba behind killing of three bjp leaders in kulgam district of j k says igp vijay kumar aau 85
Next Stories
1 US Election : …तर अमेरिकेत अराजकता माजेल; झुकेरबर्गने व्यक्त केली भीती
2 जेव्हा कुंपणच शेत खातं ! सट्टेबाजांवर कारवाई करणाऱ्या पथकातील पोलीस कर्मचारी चालवत होता स्वतःचा अड्डा
3 आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्करानं लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅपसारखं मेसेजिंग अ‍ॅप
Just Now!
X