News Flash

काश्मीर : दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त

सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांचा एक छुपा उड्डा उद्ध्वस्त केला आणि शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

जम्मू : जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मन्याल भागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांचा एक छुपा उड्डा उद्ध्वस्त केला आणि शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला.

ठाणामंडीतील अझमताबाद भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर व पोलीस यांनी मन्याल, दाना व कोपरा येथे संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाने मन्याल येथील अड्डा शोधून काढला. या अड्ड्यात त्यांना ४ पिस्तुले व त्यांची ८ मॅगझिन, एक एके रायफल व तिचे दोन मॅगझिन, ५४ काडतुसे आणि इतर साहित्य सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.काश्मीर खोऱ्यात पाठवण्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याचा हा साठा अलीकडेच या भागात ड्रोनच्या साहाय्याने टाकण्यात आला असावा असे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:21 am

Web Title: terrorist hideout destroyed akp 94
Next Stories
1 व्यंगचित्रकार मंजुल यांच्या ट्विटर खात्यावर कारवाईची सरकारची शिफारस
2 श्रेयवादातून करोना उपायांकडे दुर्लक्ष
3 उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर खात्याला पुन्हा ‘ब्लू टिक’
Just Now!
X