News Flash

जम्मू काश्मीर: सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला जवानांनी केलं ठार

सुरक्षा जवानांनी दहशतवादी झाहीद दासचा केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवान आणि सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी झाहीद दास याचा खात्मा करण्यात आला. अनंतनाग येथे जवानांनी त्याला घेरलं होतं. पण तेथून निसटण्यात तो यशस्वी झाला होता.

सीआरपीएफ आणि विशेष मोहीम पथकाकडून रात्री उशिरा संयुक्तपणे सर्च मोहीम सुरु करण्यात आली होती. यावेली चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. काश्मीर पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दहशतवादी झाहीद मारला गेला असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात अनंतनाग येथे सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला होता. तर सहा वर्षीय निहान याचाही मृत्यू झाला होता. निहान पार्क करण्यात आलेल्या गाडीत झोपला असताना त्याला गोळी लागली. २६ जून रोजी हा हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी दुचाकीवरुन आले होते आणि गोळीबार केला.

हल्ल्यानंतर पोलिसांनी लगेचच दहशतवादी झाहीदचा फोटो प्रसिद्ध केला होता. झाहीदचा हा इस्लामिक स्टेट (ISJK) या दहशतवादी ग्रुपचा सदस्य होता. मंगळवारी सुरक्षा जवानांनी झाहीद आणि इतर दोन दहशतवाद्यांना घेरलं होतं. पण यावेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तर इतर दोन दहशतावादी ठार झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 11:39 am

Web Title: terrorist shot dead in srinagar who had killed crpf jawan and six year old sgy 87
Next Stories
1 भारत-चीनमध्ये तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल
2 Jio मध्ये गुंतवणूकदारांची ‘लाट’, आता Intel Capital करणार मोठी गुंतवणूक
3 देशात पहिली करोना लस COVAXIN १५ ऑगस्ट रोजीच बाजारात येणार?
Just Now!
X