News Flash

श्रीनगरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, पोलीस उपनिरीक्षक शहीद

वर्षभरातला दहशतवाद्यांचा श्रीनगरवर हा तिसरा हल्ला आहे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे छुपे आणि भ्याड हल्ले सुरूच आहेत. शनिवारी श्रीनगरच्या पांथा चौकात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या हल्ल्यात सीआरएफचे पोलीस उप निरीक्षक शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहे. यानंतर प्रत्युत्तरादाखल केंद्रीय राखीव पोलीस दलानेही गोळीबार केला. ज्यानंतर दहशतवादी डीपीएस शाळेत घुसले आणि त्यांनी शाळेचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांनी या शाळेला वेढा दिला. या दहशतवाद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे.

दहशतवाद्यांनी ज्या शाळेत घुसखोरी केली आहे, त्या शाळेत एकही विद्यार्थी आणि शिक्षक नाहीये ही समाधानाची बाब आहे. नाहीतर दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते. आर्मी कँट भागात हा हल्ला झाला आहे. वर्षभरात तिसऱ्यांदा श्रीनगरवर दहशतवादी हल्ला झाला आहे. याआधी पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले होते.

लष्करचा कमांडर जुनैद मट्टू याला सैन्यदलाने ठार केल्यापासून दहशतवादी आणखी बिथरले आहेत. त्याचमुळे ते राखीव दलाच्या तुकड्या आणि जवानांवर हल्ले करत आहेत. गुरुवारी श्रीनगरमध्येच डीएसपी मोहम्मद अयूब पंडित यांना दगडाने ठेचून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. आता याच भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. ज्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2017 7:12 pm

Web Title: terrorist strike kills crpf si injures two jawan
Next Stories
1 ’कलाकारांच्या राजकारणात येण्यामुळेच तामिळनाडू भ्रष्ट राज्यांच्या यादीत!’
2 ‘आधार’ कार्डासंदर्भातली सरकारी आकडेवारी सदोष
3 पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार
Just Now!
X