26 February 2021

News Flash

जम्मू काश्मीर-पंजाब सीमारेषेवर तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त

जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे

जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू काश्मीर-पंजाब सीमारेषेवर या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दहशतवाद्यांकडून सहा एके-४७ रायफल्स जप्त केल्या आहेत. लखनपूर येथे पोलिसांनी ट्रक तपासणीसाठी थांबवलं असता ही कारवाई करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रकमधून शस्त्रांची वाहतूक करत होते.

गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जम्मू-पठाणकोट हायवेवर तपासणीसाठी ट्रक थांबवण्यात आला होता. तपासणी केली असता सहा एके-४७ रायफल्स सापडल्या अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मकेश सिंह यांनी दिली आहे. ट्रक पंजाबमधील बामियाल येथून काश्मीरच्या दिशेने चालला होता.

पोलीस याप्रकरणी अजून तपास करत असल्याचंही मकेश सिंह यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्यांची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 12:38 pm

Web Title: terrorists arrested near punjab jk border ak 47 rifles recovered sgy 87
Next Stories
1 जगाचा आमच्यावर विश्वास राहिलेला नाही; पाकिस्तानी मंत्र्याने व्यक्त केली खंत
2 MDH च्या मसाल्यामध्ये अढळले घातक जीवाणू, अमेरिकेने परत पाठवले मसाले
3 चांद्रयान-२ : ऑर्बिटरने टिपलेले ‘हे’ फोटो खरे आहेत का?
Just Now!
X