22 November 2019

News Flash

काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

अनंतनाग बस स्थानकाजवळ झाला हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. अनंतनाग बस स्थानकाजवळ झालेल्या या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.  तर एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.  या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू होता.

एका दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बी / ११६ या बटलीयनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले.  या घटनेत एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. घटना घडली त्या परिसरात सर्व बाजुंनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय आणखी जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबारही सुरू आहे. अशी माहिती सीआरपीएफकडून देण्यात आली आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. शिवाय गोळीबारात एक जवान जखमी देखील झाला होता. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैन्याकडून सडतोड प्रत्युत्तर देण्यात आले होते.

First Published on June 12, 2019 5:28 pm

Web Title: terrorists attack on crpf in at kp road in anantnag msr 87
Just Now!
X