News Flash

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन भाजपा कार्यकर्ते ठार

पोलिसांनी याप्रकरणी शोध मोहीमही सुरु केली आहे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात भाजपाचे तीन कार्यकर्ते ठार झाले आहेत. फिदा हुसैन यातू, उमेर रशिद बेग आणि उमेर रमझान हजीम अशी या तिघांची नावं आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपाचे हे तिन्ही कार्यकर्ते मारले गेले. गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच पोलिसांनी या भागांमध्ये शोध मोहीमही सुरु केली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसंच ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांचा शोध सुरु केला आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ही घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या फिदा हुसैन यातू, उमेर रशिद बेग आणि उमेर रमझान हजम या तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. हे तिघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रुग्णालयात आणण्यापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 10:55 pm

Web Title: terrorists fired upon three bjp workers in jammu kashmir they shot dead in attack scj 81
Next Stories
1 लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार; माजी पंतप्रधानांचं धक्कादायक वक्तव्य
2 या लढ्यामध्ये भारत फ्रान्ससोबत; पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
3 अरेरे ओशाळली माणुसकी! व्हेटिंलेटरवर असलेल्या २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्याने केला बलात्कार
Just Now!
X