पाकिस्तानातल्या ग्वादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. ग्वादर हे बलोचिस्तानात आहे. सध्या या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे अशी माहिती मिळते आहे. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे असेही समजते आहे.

 

या पंचताराकिंत हॉटेलमधल्या बहुतांश पाहुण्यांना बाहेर काढण्यात आल्याचंही समजतं आहे. दहशवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आहे असं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार समजतं आहे. पाकिस्तानमधल्या ग्वादरमध्येच झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसह १४ जण मारले गेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच हा हल्ला झाला होता.