पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात 30 जवान शहीद झाल्यानंतर सरकारवर चौफेर टीका होताना दिसते आहे. यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ आणि दहशतवाद्यांना कधीही विसरता येणार नाही असा धडा शिकवू असे अरूण जेटली यांनी म्हटले आहे. जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. तर 40 जवान या हल्ल्यात जखमी झाले असून जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जे या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सैनिकांनी दाखवलेले शौर्य अतुलनीय आहे. या हल्ल्यात जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम पडावा अशीही प्रार्थना मी करतो असेही जेटली यांनी म्हटले आहे.