28 May 2020

News Flash

इलॉन मस्क जगभरात मोफत व्हेंटिलेटर्स द्यायला तयार पण एक अट…

टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे.

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे.

टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत असे इलॉन मस्कने टि्वटमध्ये म्हटले आहे. पण त्याने दोन अटी ठेवल्या आहेत. तुम्हाला व्हेंटिलेटर्सची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व भविष्यात वापरण्यासाठी तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत अशा दोन अटी मस्कने ठेवल्या आहेत.

“एफडीएने मंजुरी दिलेली अतिरिक्त व्हेंटिलेटर्स आमच्याकडे आहेत. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील हॉस्पिटल्समध्ये आम्ही ती व्हेंटिलेटर्स पोहोचवू. व्हेंटिलेटर व त्याच्या वाहतुकीसाठी एकही पैसा आकारणार नाही. पण एकच अट आहे, तुम्हाला त्या व्हेंटिलेटरची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत” असे मस्कने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

व्हेंटिलेटर्स बनवणे कठिण नाही. पण लगेच त्याची निर्मिती करता येत नाही असे मस्क मागच्या महिन्यात म्हणाला होता. स्पेसएक्सने बनवलेल्या अवकाश यानात लाईफ सपोर्ट सिस्टिम असते. व्हेंटिलेटर्स बनवणे कठिण नाही. पण ते लगेच बनवता येत नाही असे मस्क म्हणाले होते. न्यू यॉर्कमधील एका हॉस्पिटलला टेस्लाने ४० व्हेंटिलेटर्स मोफत दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 7:59 pm

Web Title: tesla ceo elon musk is offering free ventilators to hospitals dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाला रोखण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ११ महत्त्वाच्या सूचना
2 १५ एप्रिलपासून काय करायचं?; उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर
3 मानवाधिकार हे फक्त माणसांसाठीच ! लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना शिवराजसिंह चौहानांचा इशारा
Just Now!
X