01 March 2021

News Flash

टेस्ला भारतात गिगाफॅक्ट्री उभारण्याच्या तयारीत; ‘या’ राज्याने टाकलं रेड कार्पेट

इलेक्ट्रीक व्हेइकल्ससाठी जगभारतील सर्वात नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक आहे टेस्ला

फाइल फोटो (फोटो सौजन्य: असोसिएट प्रेस)

कर्नाटकमधील बंगळुरु शहरामध्ये राज्य सरकारने टेस्ला या इलेक्ट्रीक कारच्या गिगाफॅक्ट्रीसाठी तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात अमेरिकेतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टेस्लासोबत एक बैठकही पार पडली असून भारतामधील संशोधन आणि कंपनीचा देशात विस्तार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इतर कामांसंदर्भातील केंद्र उभारण्यासाठी जमीन देण्यास कर्नाटक सरकार उत्सुक आहे.

“टेस्ला कंपनीला रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (आर अ‍ॅण्ड डी) सेंटर उभारण्यासाठी तसेच निर्मितीच्या दृष्टीने कारखाना उभारण्यासाठी हवी असणारी सर्व मदत करण्यास तयार आहोत. इलेक्ट्रीक व्हेइकल्ससाठी बंगळुरु हे उत्तम ठिकाण आहे. टेस्ला या आयत्या तयार इकोसिस्टीमचा फायदा घेऊ शकते,” असं कर्नाटकच्या आर्थिक आणि औद्योगिक विभागाचे मुख्य अर्थ सचिव असणाऱ्या गौरव गुप्ता यांनी द इकनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितलं. कार गिगाफॅक्ट्रीमध्ये टेस्लाच्या गाड्या, बॅटरींचे उत्पादन घेतलं जाईल असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं. मात्र सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु असून ही दिर्घकालीन प्रक्रिया आहे असंही गुप्ता यांनी सांगितलं आहे. “आम्ही या विषयासंदर्भात सातत्याने चर्चा करत आहोत. इलेक्ट्रीक व्हेइकलसंदर्भातील स्टार्टअपसाठी बेंगळुरु हे योग्य कसं आहे यासंदर्भातील माहिती आम्ही त्यांना दिली आहे. त्याचप्रमाणे गाड्यांसाठी लागणारे वेगवेगळे भाग आणि आम्ही त्यांना देऊ शकणाऱ्या सवलतींसंदर्भातील माहिती आतापर्यंत आम्ही दिली आहे,” असं गुप्ता म्हणाले.

टेस्लाचे भारतातील पहिलं केंद्र बंगळुरुमध्ये उभारण्यासाठी प्रशासन जोमाने तयारीला लागलं आहे. जुलै महिन्यामध्ये टेस्लाने टोयोटाच्या ताब्यातील युनिट ताब्यात घेतलं आहे. याचप्रमाणे इथर एनर्जी, बॉश, डियामेलर, महिंद्रा इलेक्ट्रॉनिक्स, ओला मोबॅलिटी यासारख्या कंपन्याही याच भागामध्ये आहेत. त्यामुळेच टेस्लाला या भागामध्ये कारखाना उभारण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात टेस्लाने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेले नाही.

टेस्लाचे कार्यकारी अध्यक्ष एलॉन मस्क यांनी एक ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये २०२१ साली कंपनी भारतामध्ये पाऊल ठेवेल असं म्हटलं आहे. ‘टेस्ला क्लब इंडिया’ या फॅन अकाऊंटवरील एका ट्विटला रिप्लाय करताना मस्क यांनी ही माहिती दिली.

भारतामध्ये इलेक्ट्रीक गाड्यांना तितकीशी मागणी अद्याप नाही, तसेच किंमतीचा विचार करता या गाड्या प्रिमियम म्हणजेच महागड्या ठरतील. त्याप्रमाणे इलेक्ट्रीक गाड्यांसाठी भारतामध्ये पुरेश्याप्रमाणात सोयी उपलब्ध नाहीत, या सर्वांचा विचार करता कंपनी अगदी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन भारतीय बाजरपेठेत उडी घेण्याची शक्यता कमीच असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 3:57 pm

Web Title: tesla in talks with karnataka government for gigafactory rd center in bengaluru scsg 91
Next Stories
1 Nobel Prize 2020: हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राईस यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल जाहीर
2 भारत-अमेरिकेत होणार टू प्लस टू चर्चा, BECA करारात दडला आहे सर्वात मोठा फायदा
3 संवादातून समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्री म्हणाले, मग…; प्रियंका गांधींचा योगींना सवाल
Just Now!
X