14 July 2020

News Flash

बंगळूरुतील संस्थेकडून ‘रॅपिड कोविड – १९’ संच विकसित

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या संचाला मान्यता दिली आहे

संग्रहित छायाचित्र

 

सध्या जगात करोना विरोधात निकराची लढाई सुरू आहे. त्यात जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचणीलाही महत्त्व असताना ही चाचणी घरच्या घरीच करता येईल असा तपासणी संच येथील ‘बायोन’ या जनुकीय व मायक्रोबायोम तपासणी कंपनीने तयार केला आहे.

त्यांनी नुकताच भारतातील पहिला ‘रॅपिड कोविड १९’ संच जारी केला आहे. तज्ज्ञांच्या मते हा संच वापरण्यास अगदी सोपा असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे शक्य आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या संचाला मान्यता दिली आहे. त्यात अचूक निष्कर्ष मिळतात व त्यासाठी काही मिनिटेच वेळ लागतो. ही चाचणी या संचाच्या मदतीने करण्याकरिता तुमचे एक बोट अल्कोहोलने स्वच्छ करा , नंतर बोट टोचणी यंत्राने टोचून रक्त काढून त्याचा नमुना घ्या. त्यानंतर संचातील एका काट्रिजमध्ये हा नमुना सोडा, लगेच त्यावर ५ ते १० मिनिटात तुम्ही करोनाबाधित आहात की नाही हे दिसेल.  या संचाची किंमत २ ते ३ हजार रुपये असून जागतिक मागणी वाढल्यास तो आरोग्य सेवा कंपन्यांना कमी दरात देता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:14 am

Web Title: test corona now at home abn 97
Next Stories
1 करोना व्हायरसवर मोदी-ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा
2 २४ तासात ५२५ करोना रुग्ण, भारताची रुग्णसंख्या ३०७२
3 टाळ्या वाजवून, दिवे लावून करोनाचं संकट दूर होणार नाही-राहुल गांधी
Just Now!
X