गैरव्यवहाराच्या आरोपानंतर लसपुरवठ्याचा करार रद्द
ब्राझीलने भारत बायोटेकच्या कोविड १९ लशीच्या चाचण्या अखेर  थांबवल्या आहेत. कंपनीचा ब्राझील बरोबरचा करार तेथील औषध नियंत्रक कंपनीने रद्द केला असून त्यानंतर या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत बायोटेकने शुक्रवारी म्हटले आहे, की प्रिसिसा मेडिकॅमेंटॉस व एनव्हिक्सिया फार्मास्युटिकल्स बरोबरचा करार रद्द करण्यात आला आहे. समझोता करार आता अमलात राहणार नाही.

ब्राझील सरकारने २ कोटी कोव्हॅक्सिन लशींच्या पुरवठ्याचे कंत्राट दिले होते. या खरेदीत सरकाने गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा फटका कोव्हॅक्सिनला बसला आहे. भारत बायोटेकने मात्र आपली बाजू स्पष्ट केली असूून या प्रकरणात कंपनीने कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी मात्र दोन जणांवर कोव्हॅक्सिन लस खरेदीसाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता.

एनव्हिक्सियाने शुक्रवारच्या चाचण्या थांबवल्या असून आता त्या होणार नाहीत, असे ब्राझीलच्या औषध नियंत्रक कंपनीने म्हटले आहे.

प्रिसिसा मेडिकॅमेंटॉस ही भारत बायोटेकची भागीदार कंपनी असून या कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची तयारी सुरू केली होती, पण आता या कंपनीच्या चाचण्याही थांबवण्यात आल्या आहेत. करार मोडीत काढण्यात आला असून आता चाचण्या करू नयेत असे भारत बायोटेकला कळवले असल्याची माहिती ब्राझीलच्या औषध नियंत्रकांनी दिली आहे. दरम्यान अ‍ॅनव्हिसाने म्हटले आहे की, ते त्यांच्या संस्थेतील प्रक्रियांचा आढावा घेऊन पुन्हा प्रयत्न करतील. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोव्हॅक्सिनच्या वैद्यकीय चाचण्या ब्राझीलमध्ये होऊ शकल्या नाहीत.

ब्राझील सरकारने केलेल्या चौकशीमुळे भारत बायोटेककडून केला जाणारा पुरवठाही थांबवण्यात आला होता. अ‍ॅनव्हिसा या ब्राझिलियन कंपनीबरोबर आपले काम सुरूच राहील, असे भारत  बायोटेकने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियात करोना टाळेबंदीविरोधात मोर्चे

सिडनी : ऑस्ट्रेलियात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या टाळेबंदी निर्बंधांविरोधात शनिवारी सिडनीसह इतर अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले. टाळेबंदीस विरोध करणाऱ्या या निदर्शकांनी पोलिसांचे अडथळे दूर करून  प्लास्टिकच्या बाटल्या आणि लहान फांद्यांचा मारा केला. सिडनीमध्ये निदर्शकांनी मुखपट्ट्या घातल्या नव्हत्या. तेथील व्हिक्टोरिया पार्कपासून निघालेला हा मोर्चा टाऊन हॉलपर्यंत नेण्यात आला. स्वातंत्र्य आणि सत्य अशा घोषणा निदर्शक देत होते. यापैकी अनेकांना पोलिसांनी अटक केली. न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, भाषणस्वातंत्र्य आणि शांततेत एकत्र येण्याचा नागरिकांचा हक्क आम्हाला मान्य असला तरी निदर्शकांनी सार्वजनिक आरोग्यविषयक आदेशांचे उल्लंघन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tests of covacin finally closed in brazil akp
First published on: 25-07-2021 at 00:31 IST