05 June 2020

News Flash

Corona virus: खासगी लॅबमध्येही चाचणी होणार मोफत-सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संग्रहित छायाचित्र

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. आधी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी ४ हजार ५०० रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे खासगी लॅबमध्येही चाचणी मोफत होईल असं म्हटलं आहे.

वकील शशांक देव सुधी यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाउनमध्ये अनेक लोकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशात लोक चाचणी महाग आहे म्हणून ती करणार नाहीत. ज्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच सरकारी रुग्णालयात ज्या प्रमाणे करोनाची चाचणी मोफत होते तशीच खासगी लॅबमध्येही करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

सुप्रीम वकील शशांक देव सुधी यांनी केलेली मागणी रास्त आहे असं म्हणत आता खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी मोफत होईल असा निर्णय दिला आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात चाचण्या जेवढ्या होतील तेवढी रुग्णसंख्या जास्त प्रमाणात कळू शकेल असंही कोर्टाने म्हटलं आहे. ज्या खासगी लॅब्सना करोना चाचणी करण्याची संमती दिली आहे, त्यांना सरकारने कोर्टाच्या निर्णयाची माहिती द्यावी. करोनाची चाचणी मोफत केली गेली पाहिजे याबद्दलचे निर्देश त्यांना सरकारने द्यावेत असंही कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणातल्या पुढल्या सुनावणी दरम्यान खासगी लॅबना या चाचण्यांसाठी काही विशिष्ट निधी द्यायचा का? यावर विचार केला जाईल. तूर्तास लोकांच्या चाचण्या मोफत होणं आवश्यक आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 9:38 pm

Web Title: tests relating to covid19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost says supreme court scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 तबलिगी मरकज : राज्याच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागितली आठ प्रश्नांची उत्तरे
2 लॉकडाउन वाढणार की, संपणार, ११ एप्रिलनंतर अंतिम फैसला
3 इंदूर : लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर दगडांनी हल्ला, ६ अटकेत
Just Now!
X