22 October 2020

News Flash

२ वर्षांच्या मुलीला विकण्याच्या तयारीत असलेल्या आईला ४० वर्षांचा तुरुंगवास

१२०० डॉलर्समध्ये आपल्या पोटच्या मुलीची विक्री ही बाई करणार होती अशी माहिती समोर आली आहे

२ वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकण्याच्या तयारीत आईला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १२०० डॉलर्समध्ये आपल्या पोटच्या मुलीची विक्री ही बाई करणार होती अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सास या राज्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. www.rt.com ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

बाल-तस्करी आणि विक्री संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन टेक्सासमध्ये राबवण्यात आले. या दरम्यान एक आईच आपल्या मुलीला विकण्याच्या तयारीत होती असे समजले आहे. साराह पीटर्स असे या महिलेचे नाव आहे. तिला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी कोर्टाने तिला या प्रकरणी ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. साराह पीटर्सने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी तिने १२०० डॉलर्सची किंमतीही लावली होती.

बाल तस्करी किंवा विक्रीबाबत टेक्सासमध्ये काय सुरु आहे याची पडताळणी सरकारतर्फे करण्यात येत होती. त्यात वेबसाईटवर अशा काही जाहिराती आहेत का? हे शोधत असताना पोलिसांना साराह पीटर्सचा डेटा मिळाला त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आणि कोर्टापुढे हजर केले. यानंतर कोर्टाने साराह पीटर्सला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 3:40 pm

Web Title: texas woman sentenced to 40yrs in prison for pimping out her 2 year daughter
Next Stories
1 हिरव्या झेंडयावर बंदी घाला! सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
2 चीनमध्ये इस्लाम खतरेंमे, 16 वर्षांपर्यंत कुराण शिकवण्यास बंदी
3 ‘माँ-माटी-मानुष’ ही ममतांची घोषणा हवेत विरली, बंगालमध्ये तर पूजा करणेही कठीण-पंतप्रधान
Just Now!
X