जगातील सर्वाधिक काळ राजेपद भूषविणाऱ्यांमध्ये गणना होणारे थायलंडचे राजे भूमिबोल अद्युल्यादेज यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८८ वर्षांचे राजे भूमिबोल यांना रक्ताचा संसर्ग झाला आहे.
राजे भूमिबोल चाक्री घराण्याचे वंशज असून तब्बल १८व्या शतकापासून या घराण्याचे राज्य थायलंडवर आहे. भूमिबोल यांचा जन्म अमेरिकेत तर शिक्षण स्वित्र्झलडमध्ये झाले. १९४६ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून ते थायलंडचे राजे आहेत. त्यांच्या कार्यकाळात थायलंडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या. तब्बल २० पंतप्रधान त्यांनी पाहिले आहेत.