News Flash

पत्रकारांच्या प्रश्नांना वैतागून थायलंडच्या पंतप्रधानांनी केले असे काही; विडियो झाला व्हायरल

नेटिझन्सनाही पाहून वाटले आश्चर्य

छायाचित्र सौजन्य: रॉयटर्स

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी नेत्याने त्याचे उत्तर देणे टाळलेले किंवा मधूनच उठून गेलेले आपण बऱ्याचदा पाहिले असेल. पण एखाद्या नेत्याने उत्तर न देण्यासाठी काहीतरी विचित्र केलेले काही बघितले आहे का? थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असेच काही विचित्र केले. यावेळी जमलेल्या पत्रकारांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले. पंतप्रधान अचानक आपल्या जागेवरून पत्रकारांकडे आले आणि त्यांनी पत्रकारांवर सॅनिटायझरची फवारणी केली. तेव्हा जमलेले अनेकजण स्तब्ध आणि विस्मित झाले. पत्रकार त्यांना विचारत असलेल्या अवघड प्रश्नांमुळे ते चिडले होते.

रिक्त मंत्रिमंडळ पदासाठी संभाव्य उमेदवारांच्या यादीबद्दल जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा प्रुथ चान-ओचा यांना ते आवडले नाही. गेल्या आठवड्यात त्याच्या तीन मंत्र्यांना सात वर्षांपूर्वी झालेल्या निषेधाच्या वेळी बंडखोरी केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याबद्दलही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार व्यासपीठावर उभे असताना प्रयुथ यांनी पत्रकारांना विचारले, “विचारायला अजून काही आहे का? मला माहित नाही, मी ते पाहिले नाही. पंतप्रधानांना आधी हे माहित असणे आवश्यक आहे काय?” एजन्सीनेही या मनोरंजक आणि धक्कादायक दृश्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये, थाई पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेचे चित्रण आहे, त्यांनी व्यासपीठ सोडले, हातात सॅनिटायझरची एक छोटी बाटली घेतली, पत्रकारांकडे सहजपणे फिरायला आले आणि स्वत: च्या चेहऱ्यावर रूमाल ठेवून पत्रकारांवर सॅनिटायझरची फवारणी केली.

व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर, त्याला ६६.९ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि कित्येकांनी तो रिट्वीट केला. नेटिझन्सनाही संपूर्ण स्थिती पाहून आश्चर्य वाटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 1:54 pm

Web Title: thailand pm sprays sanitiser on journalists after getting frusteded with questions sbi 84
Next Stories
1 विसरा आता बुलेट थाळी, बाहुबली थाळी
2 दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी ६० वर्षांच्या तरूणाने जे केले त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही
3 “प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे, प्रश्न नोकरी की…”; प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी पोस्ट
Just Now!
X