19 September 2020

News Flash

करोना व्हायरसच्या आजाराचं मूळ शोधून काढण्यासाठी थायलंडमध्ये संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेमध्ये

खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत...

फोटो सौजन्य - असोसिएटड प्रेस

थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत. वटवाघुळांचा अधिवास असलेल्या गुहेमध्ये जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस या आजाराच मूळ शोधून काढणं हा थायलंडमधल्या संशोधकांचा ट्रेकिंगमागचा मूळ उद्देश आहे.

आतापर्यंत झालेल्या प्राथमिक संशोधनातून वटवाघुळचं करोना व्हायरसचे वाहक असल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डाटानुसार, आतापर्यंत जगभरात अडीच कोटी लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात ७ लाख ४८ हजार नागरिकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये हॉर्सशू वटवाघुळाच्या १९ प्रजाती आहेत. पण करोना व्हायरसंबंधी अजून त्यांची चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितले. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

थायलंडच्या पश्चिम प्रांतातील कांचनबुरी येथील साई योक नॅशनल पार्कमध्ये तीन वेगवेगळया गुहेमधून येणारी वटवाघुळे पकडण्यासाठी संशोधकांनी जाळे लावले होते. थाई रेड क्रॉस इन्फेकशियस डिजीस हेल्थ सायन्स सेंटरच्या टीमने वटवाघुळांची लाळ, रक्त आणि स्टूलचे नमुने घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. हॉर्सशू वटवाघुळांचेच नाही तर अन्य वटवाघुळांच्या प्रजातीचे सुद्धा नमुने गोळा केले. ही वटवाघुळे कुठल्या रोगकारी जंतूचे वहन करतात, ते समजून घेण्यासाठी या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

सेंटरचे उपप्रमुख सुपापॉर्न वाचाराप्लुसादी या टीमचे नेतृत्व करत होत्या. वटवाघुळे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या आजारांचा ते मागच्या २० वर्षांपासून अभ्यास करत आहेत. जानेवारी महिन्यात थायलंडमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची ओळख पटवण्याच्या टीममध्ये त्या होत्या. COVID-19 ला कारणीभूत ठरलेला व्हायरस थायलंडमधल्या वटवाघुळांमध्ये सापडेल असा त्यांना विशवास आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:50 pm

Web Title: thailand scientists trek in countryside catch bats to trace coronavirus origins dmp 82
Next Stories
1 अधिकाऱ्यांची ट्रान्सफर नाही, पुराव्यांशिवाय चौकशी करता येणार नाही; कात टाकणार आयकर विभाग
2 भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात
3 राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह, भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर होते हजर
Just Now!
X