‘शी टीम’च्या करड्या नजरेमुळे हैदराबादमधील महिलांबाबतच्या गुन्ह्यात जवळजवळ २० टक्के घट झाली आहे. ‘शी टीम’मध्ये जास्त करून स्त्रियांचा सहभाग असून, महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी २०१४ मध्ये या तुकडीची निर्मिती करण्यात आली. यावर्षी सप्टेंबरपर्यंत महिलांना त्रास देण्याची आणि विनयभंगाची एकंदर १२९६ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत नोंदविण्यात आलेल्या या गुन्ह्यांची संख्या १५२१ उतकी होती. २०१४ मध्ये २४ ऑक्टोबरला ‘शी टीम’ची स्थापना करण्यात आली. हैदराबाद शहर महिलांसाठी सुरक्षित बनविणे हा यामागील उद्देश होता. स्थापनेपासूनच ‘शी टीम’ त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर मेहनत घेत असून, हैदराबाद शहर स्त्रियांसाठी सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचे हैदराबाद पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देण्याचे प्रकार कमी होताना दिसत असून, मुलेदेखील मुलींची छेड काढताना आढळून येत नाहीत. ‘शी टीम’ची आपल्यावर नजर असल्याचे भय त्यांच्यात निर्माण झाले आहे. हैदराबादमधील महिलांसंबंधीच्या अपराधांमध्ये २० टक्के घट झाल्याची माहिती स्वाती लकडा (अप्पर पोलीस आयुक्त – क्राइम अॅण्ड एसआयटी) यांनी दिली. ‘शी टीम’ने आत्तापर्यंत गस्तीदरम्यान एकंदर ८०० जणांना अपराध करताना पकडले असून, यात २२२ अल्पवयीन आणि ५७७ सज्ञान आहेत. फोन, ई-मेल, सोशल मीडिया इत्यादीच्या माध्यमातून स्त्रियांना त्रास देणाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्यात आल्याचे स्वाती यांनी सांगितले. महिलांचा पाठलाग करणे, फोनवर अथवा प्रत्यक्ष अश्लील टिप्पणी करणे, सोशल मीडियावर त्रास देणे, मोबाईलवर फोटो अथवा व्हिडिओ पाठविणे, अनुचित प्रकारे स्पर्श करणे, परवानगीविना फोटो काढणे, याशिवाय दुचाकी अथवा चारचाकीचा वापर करून बस स्टॉप, कॉलेज, हॉस्टेल इत्यादी परिसरात उपद्रव माजविणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

अल्पवयीन मुलांच्याबाबतीत त्यांच्या आई-वडिलांच्या समक्ष मानोपसचारतज्ज्ञामार्फत समजावले जाते. ‘शी टीम’चे अधिकारी सामान्य वेशात गस्त घालत असतात. कॉलेजजवळ अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येते. त्यांच्याजवळील गुप्त कॅमेराने  घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात. शी टीमच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.