News Flash

“माझा एन्काउंटर केला नाही म्हणून उत्तर प्रदेश सरकारचे आभार”

उत्तर प्रदेशात राजा राजधर्म न करता फक्त बाल हट्ट करत आहे

गोरखपूर येथील डॉ. काफिल खान यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत केलेला आरोप रद्द करत अलहाबाद उच्च न्यायालयानं बुधवारी त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर खान यांची मुक्तता करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खान यांनी उत्तर प्रदेश सरकारचे एन्काउंटर न केल्याबद्दल आभार मानले.

डॉ. काफिल खान यांच्यावर सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीविषयी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली होती. द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली एनएसए कायद्यातंर्गत कारवाई करत काफिल खान यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून काफिल खान मथुरेतील तुरुंगात बंद होते. “अतिशय योग्य न्याय देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे, मला मुंबईवरून मथुरेपर्यंत आणताना माझा एन्काउंटर केला नाही, यासाठी मी एसटीफचेही आभार मानतो.” रामायणात महर्षी वाल्मिकींनी म्हटलं आहे की, राजाने राज धर्मासाठी काम केले पाहिजे, पण उत्तर प्रदेशात राजा राजधर्म न करता फक्त बाल हट्ट करत आहे,” असं त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

“न्यायालयाच्या निकालानंतरही तुरूंग अधिकाऱ्यांकडून डॉ. काफिल खान यांना बराच वेळ सोडण्यात आलं नव्हतं,” असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 12:11 pm

Web Title: thanks to uttar pradesh government for not encountering me dr kafeel khan abn 97
Next Stories
1 चीनला लागून असलेल्या सीमांवर हाय अलर्ट, तणाव कमी करण्यासाठी ‘ड्रॅगन’बरोबर चर्चा
2 गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना करोनाची लागण, राज्याच्या सीमा खुल्या करताच मोठी घडामोड
3 ‘त्या’ रात्री चीनला काही कळण्याआधीच भारतीय सैन्याने केलं ‘चेक मेट’…
Just Now!
X