News Flash

सैनिकांसाठी वातानुकूलित हेल्मेट

अमेरिकेच्या लष्कराने नवीन हेल्मेटची निर्मिती केली असून ते वातानुकूलित हेल्मेट आहे. सैनिकांना युद्धभूमीवर जास्त तापमानाचा सामना करावा लागतो ते लक्षात

| May 21, 2014 12:20 pm

अमेरिकेच्या लष्कराने नवीन हेल्मेटची निर्मिती केली असून ते वातानुकूलित हेल्मेट आहे. सैनिकांना युद्धभूमीवर जास्त तापमानाचा सामना करावा लागतो ते लक्षात घेऊन हे हेल्मेट तयार करण्यात आले असून त्यामुळे सैनिकांना निश्चितच फायदा होणार आहे.
त्यात एअर प्युरिफायिंग रेस्पीरेटर म्हणजे (शुद्ध हवेसाठी श्वासोच्छवासक) यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यात एक होस पाइप असून तो ब्लोअर युनिटनंतर फेस मास्कला जोडण्यात आलेला आहे. सैनिकाच्या पाठीशी त्याच्या बॅटरी व ब्लोअर युनिट असेल.
२०१३ मध्ये एजवूड केमिकल बायोलॉजिकल सेंटरच्या वैज्ञानिकांनी अशा प्रकारचे हेल्मेट तयार करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ते संकल्पनात्मक पातळीवर होते. आताचे हेल्मेट हे रासायनिक, जैविक, किरणोत्सारी व आण्विक श्वासोच्छवासक अशा सोयी असलेली नवीन हेल्मेट तयार केली जात आहेत. हेल्मेटच्या मास्कमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा बसवण्यात आला असून तो कमी विजेवर चालणारा व हलका आहे.  
श्वासोच्छवासक यंत्रही पारंपरिक यंत्रापेक्षा हलके आहे. लहान व्होअर हा हवा आत ओढतो व ती मास्कच्या एका बाजूला असलेल्या फिल्ट्रेशन प्रणालीतून ओढली जाते त्यामुळे खेळती हवा मिळते. जेव्हा सैनिक उच्छवास टाकतो तेव्हा हवेच्या झडपा बंद होतात व शुद्ध केलेली हवा मास्कच्या डोळ्यांच्या खोबणीकडे जाते व त्यामुळे बाहेरचे घटक आत येत नाहीत.
या हेल्मेटच्या चाचण्याही घेण्यात आल्या असून त्यात व्यावसायिक व सैनिकी वापरासाठी अशा स्वरूपाचे हेल्मेट तयार केले जातील एम-५० असे त्याचे नाव असून सैनिकांना सरपटत जाताना, पळताना, रायफल सराव करताना, युद्द सराव करताना अडचणी येणार नाहीत. त्यात काही दळणवळण यंत्रणाही बसवण्याचा विचार आहे. मास्कमधील पंखा केव्हा चालू हवा व केव्हा बंद हवा याची संवेदनशीलताही त्या हेल्मेटला प्राप्त करून दिली जाणार आहे त्यामुळे आपोआप हे सगळे घडून येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 12:20 pm

Web Title: the air conditioned helmet for soldiers
Next Stories
1 चीनमध्ये ‘विंडोज ८’ला बंदी
2 निवृत्तिवेतनासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पायपीट वाचणार
3 शीख विरोधी दंगलीतील पीडितास वाढीव भरपाईला नकार
Just Now!
X