भोपाळ येथे स्फोटानंतर बंद पडलेल्या युनियन कार्बाईड कारखान्यातील विषारी कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी योजना आखली जात आहे. डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या या दुर्घटनेत २५ हजार लोक मृत्युमुखी पडले होते.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, युनियन कार्बाईड कंपनीचा कचरा उचलून त्याची सुरक्षित विल्हेवाट लावली जाईल. विषारी कचरा असल्याने त्याची पुरेशी काळजी घेतली जाईल. अनेक टन विषारी कचरा कारखान्याच्या ठिकाणी टाकलेला आहे व त्याची विल्हेवाट लावलेली नाही. धार जिल्ह्य़ाकील पिथमपूर येथे हा कचरा जाळून टाकण्याची योजना होती पण स्वयंसेवी संस्थांनी निदर्शने केल्याने ते होऊ शकले नाही. देशातील प्रदूषण वाढत आहे व इंधनाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न असल्यचे ते म्हणाले.