News Flash

निवडणुकीपूर्वीच भाजपाला मिळाला आजपर्यंतचा सर्वांत मोठा निवडणूक निधी

आजवर कायमच छोट्या राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या या ट्रस्टने पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाला सर्वाधिक देणगी दिली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये भारतीय जनता पार्टीला आजवरचा सर्वांत मोठा निवडणूक निधी (देणगी) मिळाला आहे. ७ कंपन्यांनी एका ट्रस्टच्या माध्यमातून भाजपाला एकूण १६९ पैकी १४४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या कंपन्यांनी काँग्रेस आणि बिजू जनता दल या पक्षांनाही देणगी दिली आहे. आजवर कायमच छोट्या राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या या ट्रस्टने पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाला सर्वाधिक देणगी दिली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ‘प्रूडेंट इलेक्ट्रोरेल ट्रस्ट’ असे देणगी देणाऱ्या ट्रस्टचे नाव आहे.

‘प्रूडेंट इलेक्ट्रोरेल ट्रस्ट’ला याआधी ‘सत्या इलेक्ट्रोल ट्रस्ट’ नावाने ओळखले जात होते. ज्या कंपन्यांनी या ट्रस्टच्या माध्यमांतून देणग्या दिल्या आहेत. त्यामध्ये डीएलएफ (५२ कोटी), भारती ग्रुप (३३ कोटी), श्रॉफ ग्रुप (२२ कोटी), टोरेंट ग्रुप (२० कोटी), डीसीएम श्रीराम (१३ कोटी), केडिला ग्रुप (१० कोटी) आणि हल्दिया एनर्जी (८ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे.

या ट्रस्टने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ १० कोटी, बिजू जनता दलला ५ कोटी रुपयांची देणगी या आर्थिक वर्षात दिली आहे. तसेच शिरोमणी अकाली दल, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांनाही या ट्रस्टने यापूर्वी देणग्या दिल्या आहेत.

देशभरातील ९० टक्के कंपन्या केवळ याच ट्रस्टच्या माध्यमांतून राजकीय पक्षांना देणग्या देतात. भाजपाला १८ हप्त्यांमध्ये ही १४४ कोटींची देणगी देण्यात आली होती. काँग्रेसला ४ हप्त्यांमध्ये तर बीजेडीला ३ हप्त्यांमध्ये देणगीची रक्कम देण्यात आली होती. देशात सध्या २२ नोंदणीकृत इलेक्ट्रोल ट्रस्ट आहेत, यामध्ये प्रूडेंट इलेक्ट्रोल ट्रस्ट सर्वांत मोठी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 8:26 pm

Web Title: the biggest donation to the bjp ever since the elections
Next Stories
1 शाहरुख खानविरोधात आमदाराची पोलिसांत तक्रार; ‘झिरो’ सिनेमावरुन वाद
2 व्हॉटसअॅपची भुरळ ! किडनी विकून त्याला मिळवायचे होते दिड कोटी…
3 पहलाज निहलानींच्या सिनेमाला २० कट; सेन्सॉर बोर्डाविरोधात हायकोर्टात धाव
Just Now!
X