वॉशिंग्टन : अमेरिकेत लोकशाही कधी नव्हे एवढी धोक्यात असून देश घातक वळणावर आहे, अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट सदस्य व  भारतीय वंशाच्या अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवार कमला हॅरिस यांनी त्यांच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या प्रचार शुभारंभात केली आहे.

त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर सडकून टीका केली.    हॅरीस या २०१६ मध्ये सिनेटवर निवडून आल्या आहेत, २०२० मध्ये अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी घोषित केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षात ज्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यास पसंती देण्यात आली आहे त्यात त्यांचे नाव अग्रभागी आहे.  कमला हॅरिस या अमेरिकी सिनेटवर निवडू आलेल्या दुसऱ्या आफ्रिकन अमेरिकन महिला आहेत. त्या ‘लेडी ओबामा’ म्हणून ओळखल्या जातात.

हॅरिस म्हणाल्या, अमेरिका इतिहासाच्या एका वळणाूवर आहे, अमेरिकी लोकशाही आज  धोक्यात आहे. सध्याचे नेते मुक्त प्रसारमाध्यमांवर डोळा ठेवून आहेत. त्यांनी लोकशाहीचे खच्चीकरण केले आहे.