News Flash

मोठी बातमी! १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत करोना लस

प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती

संग्रहित (PTI)

देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. “१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार,” असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

“१० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार,” असल्याचंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे”.

दरम्यान करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासहित केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथकं पाठवण्यात आली असून करोनाशी लढण्यात मदत करणं हा मुख्य हेतू आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या पथकांचं नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 3:39 pm

Web Title: the centre has said people above 60 years of age will be vaccinated from march 1 sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुजरातमध्ये अंथरुणाला खिळलेल्या भाजपा उमेदवाराने जिंकून दाखवली निवडणूक
2 पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
3 West Bengal Election: क्रिकेटर मनोज तिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल!
Just Now!
X