जम्मू-काश्मीरमध्ये फुटरतावादी नेते सातत्याने येथील स्थानिक तरूणांची माथी भडकवत आलेले आहेत व अद्यापही भडकवत आहेत. काश्मीरी तरूणांच्या हातात दगड देण्यात व त्यांच्याकडून देशविरोधी घोषणाबाजी करून घेण्यामागे या फुटीरतावादी नेत्यांचा मोठा हात आहे. यामुळे येथील तरूणांचे भविष्य अंधकारात जात असताना दुसरीकडे स्वतःच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हेच फुटीरातावदी नेते त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवत आहेत.

गृहमंत्रालयाकडून या फुटीरतावादी नेत्यांची पोलखोल करण्यात आली आहे. ज्या फुटीरतावाद्यांची मुल सध्या परदेशात स्थायिक होण्याच्या मार्गावर आहेत किंवा परदेशात जाऊन शिकत आहेत. अशा फुटीरतावाद्यांची यादीच गृहमंत्रालयाने जाहीर केली आहे. यामध्ये आसिया अंद्राबीपासून ते मीरवाइच उमर फारूकसह प्रत्येक नेत्याचे नाव आहे. तर, ११२ फुटीरतावाद्यांच्या २१० मुलांनी परदेशात उच्च शिक्षण घेतलं असून ते तिथेच स्थायिक झाल्याचं उघडकीस आलं आहे. एकीकडे आपल्या मुलांना परदेशात सर्व सुखसुविधांसह सुरक्षित ठेवत दुसरीकडे काश्मिरात तरुणांना भडकावणं, हिंसा घडवून आणणं आणि बंद पुकारणं आदी कारवायांमध्ये या फुटीरतावादी नेत्यांचा मुख्य हात असतो. अशा कारवायांमध्ये अनेक तरूण जीव देखील गमावतात. याच पार्श्वभूमीवर सामान्य काश्मीरी जनतेच्या मुलांची माथी भडकावून त्यांना भटकवणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांचे संसदेत खरे रूप देशासमोर आणले गेले आहे.

परदेशात मुलं असलेल्या फुटीरतावाद्यांची नावं –
आसिया अंद्राबी (दुख्तरान-ए-मिल्लत) – एक मुलगा मलेशियात तर दुसरा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे,
बिलाल लोन – मुलगी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे.
निसार हुसैन (वहीदत ए इस्लामी) – मुलगा आणि मुलगी इराणमध्ये स्थायिक आहेत.
अशरफ सहरई (चेअरमन, तहरीक ए हुर्रियत)- दोन्ही मुलं सौदी अरबमध्ये काम करतात.
जीएम. भट्ट (आमिर ए जमात)- मुलगा सौदी अरबमध्ये डॉक्टर आहे.
मीरवाइज उमर फारूक (हुर्रियत चेअरमन)- बहिण अमेरिकेत शिकत आहे.
जहूर गिलानी (तहरीक ए हुर्रियत)- मुलगा सौदी अरबमध्ये एअरलाइन्समध्ये काम करत आहे.
मोहम्मद शफी रेशी- मुलगी अमेरिकेत पीएचडी करत आहे.
अशरफ लाया (तहरीक ए हुर्रियत) – मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
मोहम्मद युसूफ मीर ( मुस्लीम लीग)- मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे