03 March 2021

News Flash

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून… – मोदी

मन की बात कार्यक्रमात केलं भाष्यं, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केलं. ”दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला.” असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं.

तसेच, ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचं आहे. असं देखील यावेळी मोदी म्हणाले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असतो.

या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.” असं सांगितलं होतं. तसेच, शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असंही मोदी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 11:15 am

Web Title: the country was saddened to see the insult to the tricolor flag on republic day in delhi modi msr 87
Next Stories
1 एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅण्ड-बाजा पार्टीने, आम्हाला… – ओवेसी
2 इस्रायली दूतावासांना टार्गेट करण्याचा आंतरराष्ट्रीय कट? दिल्लीत लष्करी PETN स्फोटकांचा वापर
3 अनंतनागमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, दोन संघटनांच्या सहा दहशतवाद्यांना अटक
Just Now!
X