News Flash

भारतीय नौदलाला मिळणार १११ नवी हेलिकॉप्टर्स; ४६,००० कोटी रुपये मंजूर

संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण ४६,००० कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.

नौदल हेलिकॉप्टर

संरक्षण मंत्रालयाकडून नौदलासाठी १११ बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजूरी देण्यात आली आहे. यासाठी २१,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर २४,००० कोटींपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यांपैकी ३,००० कोटींपेक्षा अधिक रक्कम १५० स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी देखील देण्यात येणार आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण ४६,००० कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.


यापूर्वी गेल्या वर्षी देखील संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी २१,००० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या १११ हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजूरी दिली होती. रणनिती सहकार्य मॉडेल अंतर्गत या पहिल्या व्यवहाराला सरकारने मंजूरी दिली होती.


गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या आगाऊ युद्ध सामग्रीसाठी ९ अॅक्टिव्ह टोड ऐरे सोनार सिस्टिमच्या खरेदीसाठी ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावासाठी मंजूरी दिली होती. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत बऱ्याच काळापासून अडकून पडलेल्या या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर यावेळी स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 5:27 pm

Web Title: the defence acquisition council approved procurement for the services amounting to approximately rs 46000 crores
Next Stories
1 पंतप्रधानांचे नाव बदलले तरच भाजपाला मते मिळतील – केजरीवाल
2 २०१९ मध्ये मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने बनवल्या तीन विशेष समित्या
3 Rafale deal : संरक्षण खरेदी प्रक्रियेकडे दुर्लक्ष का केले?, सरकारने उत्तर द्यावे : चिदंबरम
Just Now!
X