08 March 2021

News Flash

‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

देवदत्त ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती.

अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी

‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. ही घटना शुक्रवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

“देवदत्तचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी देवदत्तचे दोन मोबाइल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत.

देवदत्त ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती. कोलकातामध्ये जन्मलेल्या देवदत्तने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 9:30 am

Web Title: the dirty picture actress debdutta banerjee found dead at kolkata home ssv 92
Next Stories
1 शेतकरी आज करणार ‘चक्का जाम’; दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करण्याचा निर्णय
2 आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसनं राजकीय दिशा गमावली; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून दावा
3 अमेरिकेतही फायझर लशीची शिफारस
Just Now!
X