युरोपीय बाजारातील भांडवली बाजाराच्या पडझडीचे वारे शुक्रवारी आशियाच्या दिशेने वाहिले. ७ टक्क्य़ांखालील विकास दराची चिंता वाहणाऱ्या चीनमधील प्रमुख निर्देशांक त्याच प्रमाणात आपटले. चीनमध्ये शांघाय आणि शेनझेन हे दोन प्रमुख निर्देशांक आहेत. ते शुक्रवारी अनुक्रमे ७.४ व ७.९ टक्क्य़ांपर्यंत कोसळले. तर याच भागातील हाँगकाँगचा प्रमुख निर्देशांकही १.८ टक्क्य़ांपर्यंत घसरला. अवघ्या पंधरवडय़ापूर्वी सर्वोच्च टप्प्याला असलेले तेथील प्रमुख निर्देशांक गेल्या काही सत्रांपासून दुहेरी आकडय़ात नुकसान सोसत आहेत. तीन वर्षे जुना शांघाय निर्देशांक १२ जून रोजी ५१६६.३५ या सर्वोच्च टप्प्यावर होता. तर अमेरिकेतील नॅसडॅकची बरोबरी करणारा शेनझेनही त्याच्या वरच्या स्तरावरून आता २० टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.