२००८ मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची मोदी सरकारने वाट लावल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. २००८ मध्ये वृद्धी दर हा ७.५ टक्के होता. जेवढे समाजाला झालेले नुकसान चिंताजनक आहे. तितके अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान त्यांना (पंतप्रधान मोदी) चिंताजनक वाटत नाही.

ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी निर्माण करतात आणि लोकांना भरीस पाडतात, असे चिदंबरम यांनी ‘अनडॉन्टेड: सेविंग द आइडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ८ फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या हस्ते होणार आहे.

आपल्या पुस्तकाबाबत सांगताना ते म्हणाले की, एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे. गेल्या ७१ वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, त्यापासून आपल्या लोकांना वाचवणे हे चिंतेचे खरे कारण बनले आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी लोकशाहीचे मौलिक नियम जाणत होते. त्यांनी शिष्टाचारपूर्वक १३ दिवसांनंतर, १३ महिन्यानंतर पुन्हा एकदा पाच वर्षांची सत्ता सोडली होती. समकालीन भारतात संविधानच्या प्रत्येक मुल्यांवर हल्ले होत आहेत. हिंदुत्व नावाच्या एका विचारधारेने प्रेरित होऊन त्यांना भारताच्या संविधानाच्या दस्तऐवज बदलला जाईल, अशी भीती आहे. यामुळे भारताचा विचार संपुष्टात येईल आणि त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी एका दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामाची आणि दुसऱ्या महात्मा गांधींची गरज असेल, असेही चिदंबरम यांनी म्हटले.