24 November 2020

News Flash

लस येत नाही तोवर करोनाशी लढा सुरुच ठेवायचा आहे-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाशी संवाद

लस येत नाही तोवर आपल्याला करोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे. करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.  मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

आज आपल्या देशात करोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. करोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली ताकद आहे. आपण काही फोटो पाहतो आहेत त्यातून असं दिसतंय की लोक निष्काळजीपणा करत आहेत, मास्क लावत नाहीत. करोनाबाबत जे काही नियम घालून दिले आहेत ते पाळत नाहीत. एक लक्षात ठेवा तुम्ही केलेली एक चूक ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरु शकते. सगळे आनंद साजरे करा, जबाबदारी म्हणून घराबाहेर पडा पण करोना रोखण्यासाठी जे नियम पाळणं आवश्यक आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत. कारण अद्याप करोना व्हायरससोबतची लढाई संपलेली नाही. जनता कर्फ्यूचा दिवस ते आजपर्यंत आपण ज्या नेटाने आणि धीराने लढा दिला तसाच लढा आपल्याला यापुढेही द्यायचा आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 6:12 pm

Web Title: the fight against corona continues until the vaccine arrives says pm modi scj 81
टॅग Narendra Modi
Next Stories
1 प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती
2 शोपियां पाठोपाठ पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3 …आता मोदींच्या नेतृत्वात देशभरात केवळ एकच नारा – योगी आदित्यनाथ
Just Now!
X