आज टीव्ही लावला की अर्ध्या तासाच्या मालिकेदरम्यान जवळपास दहा ते पंधरा मिनिटांच्या जाहिरातीच असतात, अशी तक्रार अनेकजण करतात. जाहिरातीकरणाचं हेच क्षेत्र आज अत्यंत प्रभवीपणे नावारुपास येत आहे. जाहिरातींच्या याच वाढत्या आणि कलात्मक क्षेत्राची सुरुवात आजच्याच दिवशी दिनांक १ जुलै १९४१ रोजी अमेरिकेत झाली होती. ‘बुलोवा’ या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीची ही जाहिरात असून, ‘डोजर्स विरुद्ध फिलाडेल्फिया फिलिज’ यांच्यातल्या बेसबॉल सामन्यापूर्वी डब्ल्यूएनबीटी या प्रसारवाहिनीवर १० सेकंदांसाठी दाखवण्यात आली होती. दहा सेकंदांसाठी चाललेल्या या जाहिरातीकरता ‘बुलोवा’ कंपनीने नऊ डॉलर इतकी रक्कम मोजली होती. अतिशय साधे सादरीकरण असलेल्या या जाहिरातीत पार्श्वभागात ‘अमेरिका रन्स ऑन बुलोवा टाइम’ अशा आवाजासह अमेरिकेच्या नकाशावर ‘बुलोवा’चे घड्याळ दाखवण्यात आले होते.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध