News Flash

कर्करोगास कारण ठरणा-या चारपदरी डीएनएचा शोध

मानवी जिनोममध्ये जी क्वाड्राप्लेक्स डीएनए अस्तित्वात आहेत ते ग्वानिनची (जी)निर्मिती ज्या भागात होते तेथे असतात. डीएनएच्या आवृत्त्या निघण्याची जी प्रक्रिया असते ती पेशीविभाजनात महत्त्वाची असते.

| January 22, 2013 01:30 am

चार धाग्यांचा क्वाड्राप्लेक्स डीएनए
मानवी जिनोममध्ये जी क्वाड्राप्लेक्स डीएनए अस्तित्वात आहेत ते ग्वानिनची (जी)निर्मिती ज्या भागात होते तेथे असतात. डीएनएच्या आवृत्त्या निघण्याची जी प्रक्रिया असते ती पेशीविभाजनात महत्त्वाची असते. ती या चार धाग्यांच्या डीएनएच्या संख्येवर अवलंबून असते असे दिसून आल्याचे ‘नेचर केमिस्ट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हटले आहे. हा डीएनए परीक्षानळीत बाह्य़पात्र पद्धतीने तयार करता येतो. आता तो मानवी पेशींच्या डीएनएमध्ये तयार होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

कर्करोगकारक जनुके
डीएनएच्या आवृत्त्या वाढवणारी व उत्परिवर्तन घडवून आणणारी कर्करोगकारक जनुके पेशींची संख्या वाढवतात व त्यांच्या बेसुमार वाढीमुळे कर्करोग होतो, पण या कर्करोगकारक जनुकांची डीएनए आवृत्त्या काढण्याची क्षमता ही या चार पदरी डीएनएवर अवलंबून असते.

‘ ज्या पेशींचे अर्निबध पद्धतीने विभाजन होत जाते त्यांच्यातील जनुकात या क्वाड्रप्लेक्स डीएनएचा समावेश असतो.
 त्यामुळे कुठल्याही व्यक्तीची जनुकीय तपासणी करून त्याच्यावर कर्करोगासाठी उपचार करता येतील.
चार पदरी डीएनएला अटकाव करणारी औषधे तयार करता येतील. त्यामुळे पेशी विभाजनाची अनियंत्रित प्रक्रिया रोखता येईल’

शंकर बालसुब्रह्मण्यम

संकल्पनात्मक पातळीवरील डीएनए  प्रत्यक्षात मानवी शरीरात अस्तित्वात
 केंब्रिजच्या वैज्ञानिकांनी प्रथमच एक चार धाग्यांचा डीएनए शोधून काढला असून त्याच्या मदतीने कर्करोगावरील उपचारात मोठी क्रांती होऊ शकणार आहे. अशा प्रकारचा डीएनए मानवी शरीरात असावा अशी अटकळ बऱ्याच काळापासून होती, पण ते सिद्ध होऊ शकत नव्हते ते आता शक्य झाले आहे. या संशोधनात केंब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील भारतीय प्राध्यापक शंकर बालसुब्रह्मण्यम यांचा सहभाग आहे.

कर्करोगावर मात कशी करणार?
कर्करोगात पेशींची संख्या अर्निबध वाढत जाते याचाच अर्थ पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण राहत नाही. जर काही कृत्रिम रेणूंच्या मदतीने आपण अनियंत्रित पेशीविभाजनास कारण ठरणाऱ्या डीएनएला पकडून कैद करू शकलो तर पेशी विभाजन टळून कर्करोगावर मात करता येईल. यातील प्रमुख संशोधक गिलिया बिफी यांनी एका प्रथिनाचे असे प्रतिपिंड तयार केले आहे जे मानवी जिनोममधील क्वाड्रप्लेक्स डीएनएची संख्या जास्त असलेल्या भागांना चिकटते. त्यामुळे या जनुकांचे पेशींच्या जीवनचक्रातील महत्त्व स्पष्ट झाले आहे.जिथे हे चार धाग्यांचे डीएनए तयार होतात तो भागही या संशोधनात प्रतिपिंड शोधनाच्या प्रक्रियेतून दिसून आला आहे. पेशी विभाजनाच्या आधी डीएनएच्या आवृत्त्या निघतात त्या टप्प्याला ‘एस फेज’ असे म्हणतात, त्यात या चार पदरी डीएनएची संख्या वाढलेली दिसून येते.

‘डीएनए रचनांचे संशोधन कर्करोगावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते व यापुढचा टप्पा कर्करोगकारक पेशींमधील अशा डीएनएला अटकाव करणारी औषधे शोधून काढणे हा आहे.’
डॉ.ज्युली शार्प, कर्करोग संशोधन संस्था, इंग्लंड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 1:30 am

Web Title: the four pletted dna found wich is reason for cancer
टॅग : Cancer 2,Dna,Medical
Next Stories
1 दिल्लीत ४ लाख कुटुंबांना १२ सिलेंडर्स मिळणार
2 शिंदेंची शेरेबाजी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या पथ्यावर
3 सीमेवरील तणाव संपल्याचे खुर्शीद यांचे प्रशस्तीपत्र
Just Now!
X