News Flash

‘चिंता करण्याची आवश्यकता नाही’, करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे विधान

तिथे लॉकडाउन अधिक कडक करण्यात आला आहे.

‘चिंता करण्याची आवश्यकता नाही’, करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे विधान
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. (संग्रहित छायाचित्र)

जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. हा नवीन स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.

त्यामुळे तिथे लॉकडाउन अधिक कडक करण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनच्या धोक्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

आणखी वाचा- करोनाचा नवीन स्ट्रेन, सौदी अरेबियाचा आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय

आणखी वाचा- करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची वाढली चिंता; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातही काही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याची मागणी केली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे जगाच्याबरोबरीने भारताची देखील चिंता वाढवली आहे. कारण आधीच करोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, ‘सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 1:18 pm

Web Title: the government is alert there is no need to panic union health minister dr harsh vardhan dmp 82
Next Stories
1 करोनाचा नवीन स्ट्रेन, सौदी अरेबियाचा आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय
2 बालविवाहाला विरोध करणाऱ्या ज्येष्ठाला केलं बहिष्कृत; खाप पंचायतीतील ११ जणांना अटक
3 “हे ट्विट सेव्ह करून ठेवा, भाजपानं ९९ जागा जिंकल्या, तर ट्विटर सोडेन”
Just Now!
X