News Flash

शेतकरी आंदोलन सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं, अन्यथा….; शरद पवारांनी दिला इशारा

शेतकरी आंदोलनाच्या सद्य परिस्थितीवर केलं भाष्य

शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं अन्यथा सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी ते चांगलं नसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

पवार म्हणाले, “मला वाटतं सरकारनं संपूर्ण आंदोलनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगलं नाही.”

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत. मात्र, आता या सुधारणा घडून येऊ पाहत आहेत तर शरद पवार त्याला विरोध करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 6:41 pm

Web Title: the government should take the entire farmers agitation very seriously says sharad pawar aau 85
Next Stories
1 धक्कादायक… Game of Thrones च्या निर्मात्याची हत्या; चहामधून देण्यात आलं विष
2 कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर, सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
3 Cyber Crime: एकावर एक थाळी फ्री देत असल्याचे सांगत फेसबुकवरुन महिलेला घातला ५० हजारांचा गंडा
Just Now!
X