शिक्षण – दिल्ली येथील सेंट झेवियर्स स्कूल येथे शालेय शिक्षण, दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून कॉमर्सची पदवी, दिल्ली विद्यापीठाच्या विधी विभागातून कायद्याची पदवी.

  • १९७३-१९७७ : अरुण जेटली यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे नेते होते. आणीबाणीत १९ महिने तुरुंगवास. जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग. जनसंघात प्रवेश.
  • १९८० : भाजपत प्रवेश, भाजपच्या दिल्ली युवा शाखेचे सचिव.
  • १९८७-२००९ : वकिली व्यवसायात काम. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये वकिली. व्ही.पी.सिंग सरकारमध्ये १९८९ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, शरद यादव, माधवराव शिंदे, लालकृष्ण अडवाणी यांचे वकील. राज्यसभेत विरोधी पक्षनेते. जून २००९ मध्ये वकिली थांबवली.
  • १९९१-१९९९ : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे १९९१ मध्ये सदस्य. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष प्रवक्ते
  • २००० : कायदा, न्याय, कंपनी कामकाज खात्याचे कॅबिनेट मंत्री.
  • २००२-०३ : भाजपचे सरचिटणीस म्हणून १ जुलै २००२ रोजी नेमणूक. २००३ मध्ये पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते. २००४ मध्ये भाजपच्या पराभवानंतर वकिली व्यवसायाकडे परत
  • २००४-२०१४ : राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून २००९ मध्ये अडवाणी यांच्याकडून निवड, महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेतील चर्चेत सहभाग, अण्णा हजारे यांच्या जन लोकपाल विधेयकास पाठिंबा.
  • २०१४ : जेटली अमृतसर लोकसभा मतदारसंघात उभे राहिले असता त्यांचा काँग्रेसचे अमिरदर सिंग यांनी पराभव केला. नंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांची अर्थ, कंपनी कामकाज मंत्री, संरक्षण मंत्री म्हणून निवड केली. अर्थमंत्री म्हणून नोटाबंदी, जीएसटी हे निर्णय. रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन. अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडण्याची पद्धत त्यांच्याच काळात सुरू झाली. दिवाळखोरी व नादारी संहिता मांडली.
  • १९९९ : वाजपेयी मंत्रिमंडळात समावेश. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी माहिती व प्रसारण राज्यमंत्री व नंतर र्निगुतवणूक मंत्री
  • २९ मे २०१९ : जेटली यांनी मोदी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे कळवले. मंत्रिपद नाकारले.