12 August 2020

News Flash

कर्नाटकातील राजकीय नाट्याचा समारोप ; काँग्रेस – जेडीएसचं सरकार कोसळलं

भाजपाचा सत्तेचा मार्ग मोकळा, कुमारस्वामींनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला

अनेक दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटकातील राजकीय नाट्य अखेर आज संपले,  बहुमत चाचणीत काँग्रेस- जेडीएसचं सरकार कोसळल आहे.  दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर अखेर आज मतदान झालं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मतं पडल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामींचे सरकार गडगडले.  यानंतर  कुमारस्वामींनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. तत्पूर्वी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या भाषणानंतर विधानसभेत विश्वासमतावर मतदान व आमदारांची मोजणी झाली होती.

सरकार कोसळल्यानंतर भाजपाच्या गोटात आंनदोत्सव साजरा करणे सुरू झाले. विधानसभेबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरू केली तर सभागृहात माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी विजयाची निशाणी दाखवत जल्लोष केला. भाजपा पुढील दोन दिवसात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

BS Yeddyurappa & other Karnataka BJP MLAs show victory sign in the Assembly, after HD Kumaraswamy led Congress-JD(S) coalition government loses trust vote. pic.twitter.com/hmkGHL151z

या अगोदर मुख्यमंत्री कुमारस्वामींनी भाजपावर टीक करत म्हटले होते की, कॅबिनेटच्या बांधणीनंतर तुम्ही सरकारला कसे पाडू शकता? हे आम्हीपण पाहू की सरकार किती दिवस चालेल? मी इथेच आहे. किती काळ ‘ऑपरेशन लोटस’ . चालेल. तेव्हा तुमचे भाजपाचे लोक पळतील.  राजीनामा माझ्या खिशातच आहे. सभागृहात काय होणार ते माहित नाही. बहुमताच्या परीक्षेला मी तयार आहे, मी पळून जाणार नाही असेही ते म्हणाले होते.

तर, आज आणि उद्या बेंगळुरूत जमावबंदी कलम १४४ लागू असणार आहे. शिवाय सर्व दारु दुकाने, बार आणि पब २५ जुलैपर्यंत बंद राहाणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई  केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 7:42 pm

Web Title: the kumaraswamy government collapsed msr 87
Next Stories
1 एमटीएनएल, बीएसएनलमधील आगीच्या घटनांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
2 ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताची प्रतिक्रिया आश्चर्यकारक – इम्रान खान
3 मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याबाबत निकाल राखीव
Just Now!
X