News Flash

१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही

The monsoon session of Parliament may begin from July 19
संसदेच्या अधिवेशनात २० दिवस कामकाज चालण्याची शक्यता (photo indian express)

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होऊ शकते. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरवण्यासाठी गेल्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या या अधिवेशनात २० दिवस कामकाज चालेल. या दरम्यान, सरकार अनेक बिले सादर करु शकते. या दरम्यान, करोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.

हेही वाचा- Central Vista: “फक्त याच प्रकल्पाला विरोध का?” सुप्रीम कोर्टाचा सवाल; फेटाळली स्थगिती याचिका

करोना नियमांचे होणार पालन

अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2021 5:10 pm

Web Title: the monsoon session of parliament may begin from july 19 srk 94
Next Stories
1 अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात परवानगी; DGCI नं दिली लस आयातीसाठी मंजुरी!
2 संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांना स्वित्झर्लंडचे दरवाजे खुले
3 SBI खातेधारकांसाठी नियम बदलले, चारपेक्षा जास्त वेळा कॅश काढल्यास लागतील चार्जेस
Just Now!
X