05 April 2020

News Flash

Coronavirus : गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा

पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अन्नदात्यासाठी महत्त्वाची तरतूद

अन्नदाता अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:30 pm

Web Title: the package is worth rs 1 7 lakh crore announce by fm nirmala sitharaman scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुसाट…करोनाशी लढाई, F-1 टीम्स बनवणार व्हेंटिलेटर्स
2 जाणून घ्या, देशात किती करोना पॉझिटिव्ह रुग्ण, किती करोनामुक्त?
3 करोनाची लागण झाल्याच्या भीतीपोटी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X