News Flash

…तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे – संजय राऊत

बिहारची जनता याच संधीची वाट पाहत होती असंही म्हणाले आहेत.

संग्रहीत

बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. १६ जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल टिप्पणी केली आहे.

नितीश कुमार खूप मोठे नेते आहेत. त्यांनी स्वतःचा डाव खेळला आहे. जर एखादा नेता म्हणत असेल की ही त्याची शेवटची निवडणूक आहे. तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे. बिहारची जनता याच संधीची वाट पाहत होती. या निवडणुकीत जनता त्यांना निवृत्त करेल. असं शिवसेना संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, बिहारमध्ये तब्बल २० वर्षानंतर परिवर्तनाचे वारे दिसत आहे. आता केवळ तेजस्वी यादव यांच्याकडून आशा आहेत. विरोधक जंगलराज येईल, अशी टीका करतात. पण देशात सध्या अनेक ठिकाणी जंगलराज चालत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

आणखी वाचा- ही माझी शेवटची निवडणूक; नितीश कुमारांनी काढलं भावनिक अस्त्र

दरम्यान, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील नितीश कुमार यांच्याबद्दल आज एक विधान केलं आहे. या टप्प्यातही लोजपाचे प्रदर्शन चांगले राहील. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की नितीश कुमार हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. तर, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत म्हटले की, बिहार भविष्याचा निर्णय घेत आहे. नितीश कुमार आता थकले आहेत आणि ते आता राज्याचे नेतृत्व करण्यात असमर्थ आहेत.

आणखी वाचा- डायलॉग सुनिए डायलॉग; लालूंनी दाखवला नितीश कुमारांचा व्हिडीओ

आणखी वाचा- “नवा रेकॉर्ड सेट करा,” नरेंद्र मोदींचं बिहारमधील मतदारांना आवाहन

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 12:13 pm

Web Title: the people of bihar were waiting for this opportunity sanjay raut msr 87
Next Stories
1 हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं : संजय राऊत
2 US Election 2020 : पहिल्याच दिवशी करोनावर देणार अ‍ॅक्शन प्लॅन; आरोपांदरम्यान बायडेन यांची कामाला सुरूवात
3 …आता कर्नाटकही ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कडक कायद्याचा तयारीत
Just Now!
X