आकाशनिरीक्षकांसाठी ही सुवर्णसंधी असून, रविवारी रात्री ११ वाजता (लंडन प्रमाणवेळेनुसार) तर सोमवारी पहाटे ४ वाजता एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून, त्याचे प्रक्षेपण इंटरनेटवर थेट पाहायला मिळणार आहे.
या लघुग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात पृथ्वीवरील सर्वात महाग असलेल्या प्लॅटिनमचा मोठा साठा आहे. प्लॅटिनम हा धातू सोन्यापेक्षाही महाग असतो व तो दागिन्यांसाठी वापरला जातो. यूडब्ल्यू १५८ असे या लघुग्रहाचे नाव असून त्याचा काही भाग ९ कोटी टनांचा आहे व त्यात ५ महापद्म डॉलर (ट्रिलियन) इतक्या किमतीचे प्लॅटिनम आहे.
स्लूह प्रकल्पाच्या मदतीने या लघुग्रहाची पृथ्वी भेट कॅनरी बेटांवरून थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. वायव्य आफ्रिकेत आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतो त्या वेळी ती खगोलनिरीक्षकांना संधी असते.
हा लघुग्रह पृथ्वीच्या निकटच्या ग्रहापेक्षा ३० पट जवळ येणार आहे, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ बॉब बेरमन यांनी दिली.
या लघुग्रहावर भविष्यात खाणकाम करून त्यातील प्लॅटिनम काढून घेण्याचा विचार केला जात आहे व ते भविष्यकाळात शक्य आहे असे बेरमन यांचे मत आहे.
यूडब्ल्यू १५८ हा एक्स प्रकारचा लघुग्रह असल्याचे लघुग्रह खाणकाम कंपनीने सांगितले. कंपनीला खाणकाम करता येईल असे अनेक लघुग्रह माहीत आहेत.

महत्तम कामगिरी
’लघुग्रहाचे नाव- यूडब्ल्यू १५८
’खनिज- प्लॅटिनमने परिपूर्ण (किंमत ५ महापद्म डॉलर)
’अंतर- पृथ्वीपासून निकटच्या ग्रहाच्याही ३० पट जवळ
’उपयोग- भविष्यात खाणकाम शक्य
’या लघुग्रहाचे प्रक्षेपण व छायाचित्रे पाहण्यासाठी संकेतस्थळाचा पत्ता