राजकीय पक्षांनी त्यांचा निधी बँकांमध्येच भरावा व उमेदवाराला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत तरच पारदर्शकता व उत्तरदायित्वाचे तत्त्व पाळले जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. घटनेच्या अनुच्छेद क्रमांक ३२४ अन्वये मार्गदर्शक तत्त्वे पाळणे गरजेचे आहे. राजकीय पक्षाच्या विश्वस्ताने राज्यात व इतर पातळींवरही बँकेत खाते ठेवणे गरजेचे आहे. खाते आयसीएआयच्या नियमानुसार ठेवले गेले पाहिजे. वार्षिक लेखातपासणी झाली पाहिजे, ते सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून घेतले पाहिजे. कुणालाही २० हजाराच्या वर रक्कम देताना जिथे बँक सुविधा आहे त्या भागात ती धनादेशानेच दिली पाहिजे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.