तोंडाचा उपयोग ओरल सेक्ससाठी केला जाऊ नये. कारण तोंड हे खाण्यासाठी असते, असे वक्तव्य युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी केले आहे. आपल्याला देशात ओरल सेक्सवर बंदी घालायची असल्याचे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावर सध्या मुसेवेनी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते तोंडाच्या उपयोगाबद्दल बोलताना दिसत आहेत. ट्विटवर शेअर करण्यात आलेल्या या ३० सेकंदाच्या व्हिडिओत मुसेवेनी म्हणतात की, विदेशी लोकांमुळे ओरल सेक्सला प्रोत्साहन मिळत आहे. लोकांनी ते स्वीकारू नये. विदेशी लोकांकडून प्रोत्साहन दिल्या जात असलेल्या चुकीच्या कामांना सार्वजनिकरित्या इशारा दिला जाईल. यामध्ये ओरल सेक्स हे एक कारण आहे. तोंड हे जेवणासाठी आहे, सेक्ससाठी नाही, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले. ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार मुसेवेनी यांच्या मते, बाहेरील लोक युगांडातील लोकांना ओरल सेक्स समजावून सांगत आहेत.

मुसेवेनी यांनी वर्ष २०१४ मध्ये ओरल सेक्समुळे तोंडात किडे पडतात आणि पोटात जातात असे म्हटले होते. त्यांनी २०१४ मध्ये समलैंगिकता विरोधी कायद्यावर स्वाक्षरी केली होती आणि गे होणे अवैध ठरवले होते. युगांडामध्ये नियमित गे सेक्स करत असल्याचे आढळून आल्यास आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. जर एखादा व्यक्ती गे असल्याचे लपवत असेल तर तो ही दंडनीय अपराध मानला जातो.