News Flash

…म्हणून चीन लपवतोय गलवान खोऱ्यात ठार झालेल्या सैनिकांची संख्या

चीनच्याच लष्करी अधिकाऱ्यांकडून खुलासा

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. त्याचवेळी चीनच्या बाजूला देखील मोठी जिवीतहानी झाली. एएनआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक या संघर्षात मारले गेले. पण चीनने अजूनही याबद्दल काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गलवान खोऱ्यातील घटनेबद्दल भाष्य केले पण चीनचे नेमके किती नुकसान झाले. त्याबद्दल माहिती देण्याचे टाळले. पण आता बिजींग स्थित मिलिट्री अ‍ॅकेडमीतील लष्करी तज्ज्ञांनी गलवान खोऱ्यातील जिवीतहानीबद्दल चीन माहिती देण्याचे का टाळतोय? त्याबद्दल सांगितले आहे.

जिवीतहानीबद्दल माहिती जाहीर केल्यास वातावरण आणखी भडकू शकते. दोन्ही देशातील संबंध आणखी खराब होतील. जिवीतहानीच्या तुलनेमधून राष्ट्रवादी भावनांना आणखी चिथावणी मिळेल. यामुळे तणाव कमी करण्याचा उद्देश साध्य होणार नाही म्हणून चीन आपल्याबाजूला झालेली जिवीतहानी जाहीर करत नाहीय असे लष्करी तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर ग्लोबल टाइम्सला सांगितले.

अमेरिकन इंटेलिजन्सच्या रिपोर्टनुसार चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह ३५ सैनिक या संघर्षात ठार झाले आहेत. अमेरिकेच्या विश्लेषणानुसार, आपले सैनिक मारले गेले हे चीन मान्य करणार नाही कारण ते हा आपल्या सैन्यदलाचा अपमान समजतात. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने यूएस न्यूज वेबसाइटने हे वृत्त दिले आहे

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 1:21 pm

Web Title: the reason behind china not releasing the number of casualties galwan valley dmp 82
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : अवंतीपोरामधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा
2 भारत करोनाचे संकट संधीमध्ये बदलेल – पंतप्रधान मोदी
3 …तर भारताचा एकाचवेळी चीन, पाकिस्तान, नेपाळशी सामना
Just Now!
X