News Flash

शेतकरी आंदोलन : आणखी एका मित्र पक्षाने भाजपाची साथ सोडली

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची एनडीए आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता जवळपास महिना झाला आहे. अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने, आता हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवाय, शेतकरी संघटना देखील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारकडून हे आंदोलन थांबावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)ने आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर, कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या अगोदर अकाली दलने देखील भाजपाची साथ सोडलेली आहे.

“भारत सरकरारद्वरे आणल्या गेलेल्या कृषी विरोधी कायद्यांमुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी) एनडीए आघाडीतून वेगळं होत असल्याची घोषणा करत आहे.” असं राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी जाहीर केले.

शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी हनुमान बेनीवील यांचा तीन संसदीय समित्यांचा राजीनामा

या अगोदर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता. तसेच, या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हनुमान बेनीवाल हे आता जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.

“सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार”; मोदींच्या भाषणावर शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित केले. यावेळी त्यांनी सात राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्यांचे समर्थन केले. पंतप्रधानांच्या या भूमिकेला शेतकरी संघटनांनी उत्तर दिले असून “केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 6:54 pm

Web Title: the rlp left the nda msr 87
Next Stories
1 “भाजपा आणि काँग्रेस दोघेही कॉर्पोरेटकडून देणगी घेतात, राजकारण करुन शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यापासून भरकटवतात”
2 लव्ह जिहाद : मध्य प्रदेश कॅबिनेटनं मंजूर केलं नवं विधेयक
3 दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत अपमान करतात – नरेंद्र मोदी
Just Now!
X