News Flash

बुडणाऱ्या मित्राला वाचवायला गेले अन् जीव गमावून बसले, यूपीत चौघांचा मृत्यू

पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी एक जण नदीत बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्रांनी नदीत उडी मारली. पण चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील काली नदीत पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मुत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील काली नदीत पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मुत्यू झाला. पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी एक जण नदीत बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्रांनी नदीत उडी मारली. पण चौघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे चारही मुले मनपुरवा गावाजवळ एका वस्तीत राहत होते. सर्वजण काली नदीवर पोहायला गेले होते. चौघांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती कन्नौजचे पोलीस अधिक्षक किरिट राठोड यांनी माध्यमांना दिली

साहिल, सलमान, अरबान, उजेल अशी मृतांची नावे आहेत. हे चौघेही १४ ते १५ वयोगटाचे होते. आज (शनिवार) दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान हे चौघही काली नदीवर पोहायला गेले. त्यावेळी यांच्यातील एक जण अचानक बुडू लागला. तेव्हा इतर तीन मित्र त्याला वाचवण्यासाठी तिथे गेले. परंतु, त्यांचाही बुडून मृत्यू झाला.

पोहण्यास गेलेल्या चार मुलांपैकी दोघे गंभीर जखमी होते. तर एकाचा मृतदेह सापडला होता. परंतु, पाण्यात शोध घेतला असता आणखी एकाचा मृतदेह आढळून आला. जखमी असलेल्या दोन्ही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2018 7:46 pm

Web Title: the sinking friend went to save his life and lost his life the death of the four boys
Next Stories
1 UPSC EXAM: मजूर ते आयएएस… तामिळनाडूच्या प्रभाकरनचा प्रेरणादायी प्रवास
2 इतरांपेक्षा यादव आणि राजपूत जास्त दारु पितात, मंत्र्याचेे धक्कादायक विधान
3 जियोला ‘रग्गड’ फायदा तर आयडियाला तिप्पट नुकसान
Just Now!
X