23 September 2020

News Flash

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लवकरच दिसणार अटलजींची प्रतिमा

संसदेच्या केंद्रीय सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पूर्णाकृती प्रतिमा लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संसदेच्या केंद्रीय सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पूर्णाकृती प्रतिमा लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संसदीय समितीने वाजपेयी यांची प्रतिमा लावण्यास सहमती दर्शवली होती. त्यामुळे आता लवकरच अटलींची प्रतिमा सेन्ट्रल हॉलमध्ये दिसेल.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी या प्रतिमेसाठी प्रस्ताव मांडला होता. संसदेच्या परिसरात राष्ट्रीय नेत्यांची आणि खासदारांची छायाचित्रे लावण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मंगळवारी बैठक घेतली होती. यामध्ये सर्वांनी सर्वसंमत्तीने या प्रस्तावाला पसंती दर्शवली. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या वाजपेयींचे याच वर्षी १६ ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी, रबिंद्रनाथ टागोर, लाल बहाद्दूर शात्री, इंदिरा गांधी, शामा प्रसाद मुखर्जी, वि. दा. सावरकर यांच्यासह २२ इतर व्यक्तींच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. सेन्ट्रल हॉल ही ती जागा आहे जिथे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनासाठी संबोधित करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 11:20 am

Web Title: the statue of atal bihari vajpayee will be seen in the central hall of parliament
Next Stories
1 …तर पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त, पुण्यात चाचणी सुरु
2 क्लासला जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार
3 पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सहा वर्षांनी हमीद अन्सारी दिल्लीत दाखल
Just Now!
X