सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक छळाच्या आरोपातून क्लीन चिट देण्यात आली आहे. महिलेने केलेल्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायलयात तातडीने सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीस समितीने रंजन गोगोईंवर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळलं नाही असं म्हटलं आहे. त्याचमुळे रंजन गोगोई यांना क्लीन चिट देण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि काहीही तथ्य नसलेले आहेत. याप्रकरणी वास्तवाशी संबंधित कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे रंजन गोगोई यांना क्लीन चिट देण्यात येत आहे असे समितीने स्पष्ट केले.

सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी ३५ वर्षीय महिला ही सर्वोच्च न्यायालयाची माजी कर्मचारी आहे. डिसेंबर 2018 मध्ये तिला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. महिलेच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेतली. यासाठी जस्टिस एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. जस्टिस एसए बोबडे यांच्यासह जस्टिस इंदू मल्होत्रा आणि जस्टिस इंदिरा बॅनर्जी यांचा या समितीमध्ये समावेश होता.